Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Belgaon › पटसंख्या वाढीसाठी सरकारी शाळांतून इंग्रजी माध्यम

पटसंख्या वाढीसाठी सरकारी शाळांतून इंग्रजी माध्यम

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:02PMबेळगाव : प्रतिनिधी 

सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने आता शाळांतून एलकेजी, युकेजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एक हजार सरकारी शाळांतून इंग्रजी माध्यम सुरू करण्याची घोषणा केली आहे.   28,530  सरकारी  शाळा 1 कि. मी. अंतरावर असलेल्या 8530 सरकारी शाळांतून विलिनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा आहे. 

सरकारने  प्राथमिक व माध्यमिक आणि महाविद्यालयांच्या इमारती दुरूस्तीसाठी 150 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सरकारने प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 1000 शाळांतून इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एलकेजी, युकेजी वर्गही सुरू केले जातील.   

शाळांतून बायोमेट्रिक

राज्यातील 48 हजार सरकारी शाळांतून आता शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंद होईल. पुढील तीन वर्षात प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच सरकारी शाळेतील प्रवेश संख्या वाढविण्यासाठी अंगणवाडी केंद्रे 4100 सरकारी शाळांतून जोडण्यात येणार आहेत. त्याला बालस्नेह  केंद्र असे नाव देण्यात आले आहे. सरकारी शाळांतून पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच भारत स्काऊट आणि गाईड संस्थेमार्फत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रूपयांचे अनुदान करण्यात आले आहे. 

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश यांनी राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी मागवली होती. कमी पटसंख्या असलेल्या शाळा 1 कि. मी. अंतरावरील शाळामध्ये विलीन करण्यात येणार आहेत.