होमपेज › Belgaon › राजस्थानच्या प्रेमकहाणीचा करुण अंत

राजस्थानच्या प्रेमकहाणीचा करुण अंत

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:29AMनिपाणी : प्रतिनिधी

राजस्थानमधील प्रेमकहानीचा शनिवारी निपाणीनजीक तवंदी घाटात करुण अंत झाला. प्रेमीयुगुलापैकी प्रियकराचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक तपासाअंती म्हटले आहे.मुकेश नारायणसिंग रावत (वय 21, रा. सिमाचिक्‍की, गवार, ता. बिम, राजस्थान) असे प्रेमवीराचे नाव आहे. त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद स्वत: मुकेश रावतसोबत असलेल्या पोलिसांनी दिली आहे. 

मुकेश रावत सिमाचिक्‍की गावातील एका उद्योजकाचा मुलगा. त्याचे एका 17 वर्षीय मुलीबरोबर प्रेम जुळले; पण घरातून विरोध झाल्याने दोघांनी पळ काढून बंगळूर गाठले. घरच्यांनी त्यांचा नातेवाईकांसह शोध घेतला. मुलीच्या वडिलांनी मुकेश रावतच्या विरोधात पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाबाबत फिर्याद दिली. त्यानुसार सिमाचिक्‍की पोलिसांनी तपास करून मुकेशच्या मोबाईलवरून त्याचा बंगळूरमध्ये पत्ता शोधला. महिला कॉन्स्टेबलसह अधिकारी बंगळूरमध्ये दाखल झाले आणि बंगळूर पोलिसांच्या मदतीने त्यांनी दोघांनाही पकडले. त्यानंतर त्यांना बंगळूर-जोधपूर या खासगी बसमधून गावाकडे नेत असताना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बस शिप्पूर फाटा येथील हॉटेल कावेरी येथे चहापानासाठी थांबली.

मुकेश प्रेयसीसह पोलीस कर्मचार्‍यांची नजर चुकवित रस्त्याच्या पूर्वेकडील हॉटेलकडे निघाला. मुख्य रस्ता पार करताना ंबंगळूरहून पुण्याकडे चाललेल्या टँकरखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. मुकेशच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.घटनास्थळी हुक्केरीचे सीपीआय प्रभू गगनहळी, उपनिरीक्षक शिवकुमार मुचंडी यांनी धाव घेऊ पंचनामा केला.प्रेयसीची बोबडीच वळलीअपघातात प्रियकर गमावल्याने प्रेयसीची अक्षरश: बोबडी वळली. तिच्यासमवेत असलेल्या पोलिसांसह घरच्यांनी मोबाईलवरून बोलते करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकारामुळे तिच्या तोंडातून एकहीशब्द फुटेनासा झाला होता. त्यामुळे उपस्थितांचेही मन हेलावले.

Tags : Belgaum,  End, Rajasthan, Love, Story