Tue, May 21, 2019 12:32होमपेज › Belgaon › विधान परिषदेवर अकरा जण अविरोध

विधान परिषदेवर अकरा जण अविरोध

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:20AMबंगळूर: विधान परिषदेच्या अकरा जागांवर सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 11 जूनला या जागांसाठी मतदान होणार होते. विधान परिषद निवडणूक अधिकारी एम. एस. कुमारस्वामी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. संख्याबळानुसार भाजपला 5, काँग्रेसला 4 आणि निजदला 2 जागा मिळणार हे निश्‍चित होते. त्यानुसार तिन्ही पक्षांनी तेवढेच उमेदवार रिंगणात उतरवण्याचा आणि निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे ही निवड बिनविरोध झाली. 17 जूनला विधान परिषदेचे 11 सदस्य निवृत्त होणार आहेत. विधानसभा आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार होते.