होमपेज › Belgaon › लोंढा-बेळगाव-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण कधी?

लोंढा-बेळगाव-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण कधी?

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

अर्थसंकल्पात बेळगाव रेल्वेसेवेच्या विकासाबाबत काहीच तरतूद स्पष्ट झालेली नाही. लोंढा-बेळगाव-मिरज मार्गाचे विद्युतीकरण करण्यशाचा प्रस्ताव असला तरी त्याबाबत अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही.  त्यामुळे विद्युतीकरण होणार की नाही, हा प्रश्न आहे.

देशभरातील रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 18 हजार किलोमीटरचे दुहेरीकरण, 4 हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे  विद्युतीकरण करण्यात येणार आहे. पण बेळगाव मार्गाचे विद्युतीकरण कधी सुरू होणार, याचा उल्लेख नाही. दुहेरीकरणामध्ये मिरज ते लोंढा रेल्वे मार्गाचा यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. तसेच विद्युतीकरणालाही मान्यता देण्यात आली आहे. मागील  सहा महिन्यापासून दुहेरीकरणाच्या कामाला चालना देण्यात आली आहे. मात्र, विद्युतीकरण करण्यात सुरुवात करण्यात आलेली नाही. 

देशातील सर्व रेल्वे स्थानके व सर्व रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. तसेच वायफायची सुविधाही देण्यात येणार आहे. देशातील 600 रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करून स्वयंचलित जिना बसविण्यात येणार आहे.