Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Belgaon › सरकारी अधिकार्‍यांना इलेक्ट्रिक वाहने?

सरकारी अधिकार्‍यांना इलेक्ट्रिक वाहने?

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:21PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी अधिकार्‍यांना इलेक्ट्रिक वाहन देण्याबाबत सरकारी पातळीवर विचार केला जात आहे. सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिली आहे. बंगळूरसह संपूर्ण राज्यात हवेचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. याचा विचार करून सरकारी कार्यालयांपासूनच प्रदूषणमुक्‍तीसाठी पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमी आहे.

बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांचा वापर केला जातो. वाहनांतून निघणार्‍या धुरामुळे हवेचे प्रदूषण होते. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू झाल्यानंतर त्याचे फायदे आणि तोट्यांचा गांभीर्याने विचार केला जाणार आहे. मुुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर सरकारी अधिकार्‍यांना इलेक्ट्रिक वाहने दिली जाणार आहेत.