Mon, Nov 19, 2018 11:02होमपेज › Belgaon › वीणा लोकूर की वृषाली मराठे?

वीणा लोकूर की वृषाली मराठे?

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:21PMबेळगाव : प्रतिनिधी

अ. भा.  नाट्य परिषदेच्या मुंबई नियामक मंडळ सदस्यत्वासाठी  रविवारी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत 410 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 7 अवैध ठरले असून वीणा लोकूर यांना सर्वाधिक मते मिळाली असल्याचा अंदाज आहे. बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर, उपाध्यक्ष राजू सुतार व नाट्यकर्मी वृषाली मराठे या तिघांमध्ये निवडणुकीची रस्सीखेचहोती.   

रविवारी सकाळी 9.30 वाजता शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. निकाल जाणून घेण्यासाठी नाट्य रसिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र निवडणूक अधिकारी आसावरी शेटे यांनी अधिकृत निकाल मुंबईत 7 मार्च रोजी जाहीर होईल, असे सांगितले.

आसावरी शेटे यांच्या आततायीपणामुळे काही सदस्यांना मतदानावेळी मनस्ताप सहन करावा लागला. उमेदवार राजू सुतार यांना स्वत:च दिलेल्या उमेदवारीच्या अधिकृत ओळखपत्रानंतरही शेटे यांनी अन्य ओळखपत्रासाठी सक्ती केली. उल्हास निर्मळकर यांच्या नावात निर्मळकरऐवजी केवळ एन.सा उल्लेख होता.