Tue, Jul 23, 2019 06:58होमपेज › Belgaon › निवडणूक अधिकार्‍यांना आता परीक्षा सक्‍तीची 

निवडणूक अधिकार्‍यांना आता परीक्षा सक्‍तीची 

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:36PMबंगळूर : प्रतिनिधी       

निवडणूक कामासाठी नेमण्यात येणार्‍या अधिकार्‍यांना यापुढे निवडणूक आयोगाच्यावतीने घेण्यात येणार्‍या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. 

परीक्षेत उत्तीर्ण झाल्यासच त्यांना निवडणूक कामासाठी नेमण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण झाल्यास सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. शिवाय या अधिकार्‍यांची बढतीही रोखली जाणार आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या या अधिसूचनेची अधिकार्‍यांनी मात्र चांगलीच धास्ती घेतली आहे.मतदान प्रक्रियेसाठी म्हणून नेमण्यात येणार्‍या निवडणूक अधिकारी, उपनिवडणूक अधिकार्‍यांना नेमणुकीपूर्वी प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

उत्तीर्ण झालेल्यांचीच नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर अशा अधिकार्‍यांच्या वार्षिक सेवा पुस्तिकेत (एसआर बुक) आरओ परीक्षेत उत्तीर्ण अशी नोंद होणार आहे. या अधिकार्‍यांना बढती व सरकारच्या अन्य सुविधा मिळणार आहेत. राज्यातील 224 मतदारसंघात  प्रत्येकी एक निवडणूक अधिकारी व 329 सहाय्यक निवडणूक अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येत असते.  यापूर्वी निवडणूक कामासाठी नेमण्यात येणार्‍या अधिकार्‍यांना केवळ प्रशिक्षण देण्यात येत होते. 

परीक्षा कशी असणार?

लोकप्रतिनिधी कायदा, निवडणूक आचारसंहिता, निवडणूक आयोगाचे निर्देश, उमेदवाराची मालमत्ता? खर्च, नामांकन अर्जांचा स्वीकार, अर्जांची छाननी, इव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत म्हैसूर येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधित विषयांचे तज्ज्ञ म्हैसूर येथे येऊन प्रशिक्षण देतील. त्यानंतर परीक्षेच्या तयारीसाठी एक दिवस सुट्टी देण्यात येणार आहे.