Fri, Apr 26, 2019 04:04होमपेज › Belgaon › ‘इलेक्शन वॉच रिपोर्ट’ नवे अ‍ॅप कार्यान्वित

‘इलेक्शन वॉच रिपोर्ट’ नवे अ‍ॅप कार्यान्वित

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:33PMबंगळूर : प्रतिनिधी       

राज्यात येत्या दोन अडीच महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीर प्रकारांवर जनतेचे लक्ष राहावे, यासाठी ‘इलेक्शन वॉच रिपोर्ट’ नावाने मोबाईल अ‍ॅप व एसएमएस सेवा सुर करण्यात आली आहे. 

असोशिएशन फॉर डेमॉके्रेटिक रिफार्म्स (एडीआर) या संस्थेने सुरू केली आहे. एडीआरचे विश्वस्त त्रिलोचन शास्त्री यांनी पत्रकार परिषद देऊन ‘इलेक्शन वॉच रिपोर्ट’ची माहिती दिली. ते म्हणाले, नागरिकांना एखाद्या उमेदवाराची माहिती हवी असल्यास एसएमएस पाठवून घेता येईल. त्याचबरोबर निवडणूक काळात घडणार्‍या बेकायदेशीर प्रकाराचे फोटो व व्हिडिओ अ‍ॅपद्वारे निवडणूक आयोगाकडे पाठविता येतील. त्यासाठी ाूपशींर  ही अक्षरे टाईप करून त्यानंतर विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघांचे नाव अथवा पिन कोड टाईप करून 56070 या क्रमांकावर एसएमएस करावा.

हा एसएमएस पोचताच आमदार किंवा खासदाराची मालमत्ता, पक्ष, शैक्षणिक पात्रता आदी माहिती एसएमएसद्वारे देण्यात येईल. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत जनतेला सामावून घेऊन सक्षम उमेदवाराला निवडणून आणण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.गूगल स्टोअर किंवा डब्लूडब्लूडब्लू.एडीआरआयएनडीआयए.ओआरजी या संकेतस्थळावर डाऊनलोड करता येईल. निवडणूक रिंगणातील उमेदवार किंवा त्यांचे समर्थक मतदारांना आमिषे दाखवून मते मिळवित असतात. अशाप्रकारचे फोटो या अ‍ॅपद्वारे अपलोड करता येतील. मात्र ही माहिती पाठविणार्‍यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील.