होमपेज › Belgaon › कोणी देता का हो निष्ठावान कार्यकर्ते?

कोणी देता का हो निष्ठावान कार्यकर्ते?

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 02 2018 11:59PMबेळगाव : प्रतिनिधी 

 राज्यात  विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले आहे. यामुळे सर्वच उमेदवार विरोधी गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्यांना उधान आले आहे. निष्ठेच्या राजकारणाला मूठमाती मिळत आहे.  प्रत्येक निवडणुकीवेळी राजकारण्यांचे लक्ष  केवळ सत्ता मिळविण्यासाठी एकवटलेले असते. राजकारण्यांच्या कौशल्याची कसोटी म्हणजे निवडणुकीतील जय पराजय होय.

याशिवाय उजेडात नसलेले कार्यकर्तेही तुल्यबळ म्हणवून दहा-पंधऱा जणांचा समूह दाखवून नवख्या उमेदवारांना भूलवण्याचे कामही बरीच मंडळी करीत आहेत.  विधासभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, निजद, शिवसेना, म. ए. समिती, बसपा आदी पक्षांतून उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बहुतांशी मतदारसंघात बहुरंगी लढती होणार आहेत. मतांच्या विभागणीने प्रस्थापितांपेक्षा विरोधी व नव्याने आमदार होऊ पाहणार्‍या उमेदवारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

निवडणूक हा राजकारण्यांचा हंगाम असतो. जुन्या जाणत्या नेत्या कार्यकर्त्यांची निष्ठावान राजकारणाची घडी मात्र यामुळे विस्कटून या संकल्पनेलाच मूठमाती मिळाली आहे. तर केवळ आमदार होऊ पाहणार्‍या उमेदवारांच्या आकड्यांच्या खेळात सामान्य जनता मात्र गोंधळात पडत आहे. कार्यकर्त्यांबरोबर आपल्या पाठीमागे मतदार कसे वाढतील याचे नियोजन उमेदवारांकडून केले जात आहे.  या आकड्यांच्या खेळात तज्ज्ञ असणारे उमेदवार व केवळ मते खाण्यासाठी उभारलेला उमेदवार फोडण्यासाठी या मंडळींच्या जीवाचा आटापिटा सुरु आहे. यामध्ये अनेक आश्वासनांबरोबरच तत्काळ इच्छापूर्ती करून अर्थपूर्ण वाटाघाटी करण्यासाठी उमेदवारांची वेगळीच कमिटी कार्यरत आहे. पक्षप्रवेश करणारी मंडळी जरी आर्थिक वाटाघाटीत नसली तरी विरोधी गटाकडून मात्र त्यांच्यावर केलेे जाणारे आरोप चर्चिले जात आहेत. मते मिळविण्यासाठी वाटेल ते करण्याच्या तयारीत उतरलेल्या  या उमेदवारात रस्सीखेचही तीव्रतेने निदर्शित होत आहे. 

Tags : Election, Belgaon, Karnataka, Loyal Workers