Mon, Apr 22, 2019 12:22होमपेज › Belgaon › ‘हिंडलगा’तील आठ कैद्यांची उद्या सुटका 

‘हिंडलगा’तील आठ कैद्यांची उद्या सुटका 

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 10:32PMबेळगाव : प्रतिनिधी

हिंडलगा कारागृहात विविध प्रकरणांत शिक्षा भोगणार्‍या 8 कैद्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला  आहे. कारागृह अधीक्षकांनी वर्तन सुधारलेल्या कैद्यांच्या सुटकेचा  प्रस्ताव पाठविला होता. त्याला राज्यपालांनी संमती दिली आहे. दि. 9 रोजी बंगळूर येथील परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांची सुटका करण्यात येणार आहे. 

15 ऑगस्टला कैद्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने हिंडलगा कारागृहअधीक्षकांनी केंद्र कारागृहाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन राज्यपालांकडे शिफारस केली. मात्र, राज्यपालांनी निर्णय राखून ठेवल्याने सुटकेच्या प्रतीक्षेतील कैद्यांच्या पदरी निराशा आली होती. 

प्रस्तावावर राज्यपाल कधी निर्णय  घेणार, याकडे कैद्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. या प्रस्तावाला आता राज्यपालांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे हिंडगला कारागृह अधीक्षकांनी पाठविलेल्या 12 जणांच्या सुटकेच्या  प्रस्तावापैकी 8 जणांची सुटका केली जाणाणार आहे. तर उर्वरित 4 जणांच्या सुटकेचे अर्ज राज्यपालांनी नाकारले आहेत. 

2016?17 मधील 5 कैदी व 2017?18 मधील 12 कैदी असे एकूण 17 कैदी सुटकेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, यावर्षी 8 जणांचीच सुटका होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या व यावर्षीच्या प्रस्तावातील 9 कैद्यांच्या सुटकेला विलंब होणार आहे. सदर कार्यक्रम दरवर्षी बेळगावमध्ये आयोजित केला जात होता. यंदा प्रथमच हा  कार्यक्रम बंगळूर येथे होणार असल्याची माहिती माहिती कारागृह सूत्रांकडून देण्यात आली.

कारागृहातील वर्तन सुधारलेल्या 12 कैद्यांच्या सुटकेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला राज्यपालांनी संमती दिली असून 8 जणांची सुटका होणार आहे. तर 4 जणांचे अर्ज नाकारले आहे. सदर सुटका होणार्‍या कैद्यांना रविवारीच बंगळूरला पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुटका हाणारे कैदी खून प्रकरणातील आहेत.    -टी. पी. शेष , हिंडलगा कारागृह अधीक्षक