Wed, May 22, 2019 06:38होमपेज › Belgaon › चिकोडीत बंदच्या काळात पोलिसांचे माणुसकीचे दर्शन

चिकोडीत बंदच्या काळात पोलिसांचे माणुसकीचे दर्शन

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 9:19PM

बुकमार्क करा
 

चिकोडी : (प्रतिनिधी)

चिकोडी बंदच्या काळात शहरातील संपूर्ण व्यवहार बंद केल्याने मेडिकल, वाहतूक सेवा यासह जीवनावश्यक सेवा बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पण शहरात कायदा व सुव्यवस्था पालन करणार्‍या पोलिसांनी सेवा बजावून माणुसकीचे दर्शन घडवले.

सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान कडकडीत बंद असताना करनूर गल्लीतील रमेश गणपती मुंडे हे रक्तदाब, उलट्या व पोटदुखीने अस्वस्थ होते. उपचारासाठी दाखल करण्यास कोणतेही वाहन मिळत नसल्याने घरच्यांना काय करायचे कळत नव्हते. कृष्णा चौकात बंदोबस्तासाठी थांबलेले सीपीआय शशिकांत वर्मा यांच्या लक्षात ही बाब घरच्यांनी आणून दिली.  वर्मा यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच पोलिस व्हॅन दिली. घरच्यांनी मुंडे यांना व्हॅनमध्ये घालून चिकोडी सरकारी इस्पितळात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर  आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असताना अडचणीच्या काळात रुग्णाला मदत करून जीव वाचण्याचे काम केेलेल्या पोलिसांचे व वर्मा यांचे कौतुक करण्यात येत होते.