Thu, Jan 24, 2019 03:32होमपेज › Belgaon › ऊस क्षेत्र वाढीमुळे खरीप पिकांना बसणार फटका

ऊस क्षेत्र वाढीमुळे खरीप पिकांना बसणार फटका

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:05PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील 

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दरवर्षी उसाला दिलेल्या चांगल्या दराचा परिणाम म्हणून वर्षभरापासून ऊस क्षेत्र वाढीवर झाला आहे. ऊस क्षेत्र वाढीचा फटका खरीप पिकांना बसणार असून सोयाबीन पिकाखाली क्षेत्र कमी होणार आहे. त्याचबरोबर भुईमूग, भाजीपाला या पिकाखालील येणारे क्षेत्रही घटणार असल्याने खरिपातील धान्यांचा भाव वधारणार आहे. 

यावर्षी उसाची लागण अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुढे येणार्‍या खरीप हंगामातील पिकांच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांच्या उतार्‍यातही कमालीची घट झाली आहे.  

या भागातील शेतकरी ऊसाला कंटाळून कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणार्‍या सोयाबीन पिकाकडे मध्यंतरी वळले होते. मध्यंतरी काही वर्षे सोयाबीनचे उत्पादन कमी आल्या कारणाने त्याला दरही चांगला मिळाला होता. त्यानंतर उसाच्या दरानेही शेतकरी वर्गाला तारले होते. सोयाबीन घेतल्यानंतर त्याच पद्धतीने कमी कालावधीत कमी पाणी लागणारे कांदा पीक रब्बी हंगामात या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाचा दर घटल्याने शेतकरी वर्गाने या पिकाकडेही आता हळूहळू दुर्लक्ष केले आहे.   

गेल्या पाच वर्षांपासून अपवाद वगळता आजतागायत कांद्याला बंगळूर मार्केटमध्ये उत्कृष्ट दर मिळत आहे. त्यामुळे हे पीक घेणे ऊसापेक्षा फायदेशीर आहे. दरम्यान दोन वर्षांपासून  ऊसाला  चांगला दर मिळाल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ होऊन कांदा क्षेत्र घटले आहे. यंदाच्या हंगामात शेतकरी वर्गाला कांदा पीक हे शाप ठरले आहे. सुरुवातीपासूनच त कांद्याचे भाव तेजीत आहेत. सद्यस्थितीत कांद्याचे पीक चांगले पोसले आहे. पुढील वर्षी रब्बी हंगामातही हिच परिस्थिती उद्भवणार असून रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे अस्तित्व आता वाढीव ऊस क्षेत्रामुळे कमी होणार 
आहे. 

शेतकरीवर्गाकडून ज्या त्या  हंगामात पारंपरिक पीक पध्दती अवलंबण्यात येत होती.  मात्र हे चित्र आता बदलले आहे. यात खरिपातील सोयाबीन, भुईमूगाचा  बेवड  हा रब्बीतील पिकांना हमखास उपयुक्त ठरायचा. शिवाय रब्बीत घेण्यात येणार्‍या कांदा, गहू, हरभरा याचाही बेवड विशेषत: पीक काढणीनंतरचे धसकट, पाला, कोंडा हे रानातच पडून राहत असल्याने पुढे घेण्यात येणार्‍या पिकांना रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात करावा लागायचा. दरम्यान ऊसक्षेत्रात वाढ झाल्याने बेवड दुर्मीळ होत चालला आहे.