Mon, Jun 24, 2019 17:49होमपेज › Belgaon › जीवाच्या भीतीने वाद, पोलिसांना भलताच राग

जीवाच्या भीतीने वाद, पोलिसांना भलताच राग

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 17 2018 10:18PMबेळगाव : प्रतिनिधी

दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणार्‍यांची संख्या काही कमी नाही. एका दुचाकीवरून तिघे प्रवास करणारेही अनेक जण आहेत. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र थेट रस्त्यावर आडवे जावून पोलिसांकडून होणारी कारवाई दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. यावरून धर्मवीर संभाजी चौकात दुचाकीस्वार व रहदारी पोलिसांमध्ये वादावादी झाली. 

विनाहेल्मेट व दुचाकीवरून तीन जण प्रवास करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करत असताना अनेकवेळा रहदारी पोलिस थेट रस्त्याच्या मधोमध जावून वाहनचालकांना अडवत आहेत. वाहनाची चावी काढून घेण्यात येत असल्यानेही पोलिस व चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
Tags :  fear ,life, police angry belgaon news