Thu, Nov 14, 2019 06:03होमपेज › Belgaon › अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितिमुळे येळळूर ग्रामसभा तहकूब(video)

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितिमुळे येळळूर ग्रामसभा तहकूब(video)

Published On: Jun 27 2019 2:24PM | Last Updated: Jun 27 2019 3:23PM
बेळगाव : प्रतिनिधी

येळळूर येथे गुरुवारी (ता .२७) आयोजित केलेल्या ग्रामसभेला नोटिस दिलेल्या २५ अधिकाऱ्यापैकी काही मोजकेच अधिकारी उपस्थित राहिल्याने ग्रामसभाच तहकूब करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष अनुसया परिट होत्या. 

गावात पाणी टंचाई आणि सरकारी बँकेच्या मोठ्या समस्या आहेत, मात्र पाणी पुरवठा आणि बँक प्रतिनिधि उपस्थित न रहिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. एकूण २५ अधिकाऱ्यांना उपस्थितीची नोटिस दिली होती. सभा सुरु झाल्यानंतर पुन्हा मोबाईलवरुन निमंत्रण दिले तरीही काही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. जोपर्यंत अधिकारी उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत  सभा न घेण्याचे सर्वानुमते ठरले. तालुका  पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्रा. प. उपाध्यक्ष रुक्मिणी नाईक, कृषी अधिकारी ए. बी. पांढरे, तलाटी मयुर मासेकर, राजू उघाडे उपस्थित होते.