Fri, Apr 26, 2019 19:45होमपेज › Belgaon › जीएसटीच्या कचाट्यामुळे तंबाखू उत्पादनात घट

जीएसटीच्या कचाट्यामुळे तंबाखू उत्पादनात घट

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 7:45PMनिपाणी : मधुकर पाटील

गेल्या 18 वर्षाच्या तुलनेत तंबाखू उत्पादन क्षेत्रात 5 ते 7 हजार हेक्टरने घट झाली आहे. यंदा प्रत्यक्ष बाजारपेठेत तंबाखू दराने शंभरी ओलांडलेली नाही. गतवर्षीपासून तंबाखू खरेदी-विक्रीवर जीएसटी लागल्याने काहीअंशी यंदा पिकाचे उत्पादन घटणार आहे.

यापूर्वी जीएसटी नसताना दराने शंभरी पार केली होती. यंदाही तंबाखू उत्पादन घटणार असून त्याचा परिणाम विचारात घेता आता शेतकरीवर्ग तंबाखूला पर्याय म्हणून आंतरपिकाचा विचार करू लागला आहे. वास्तविक निपाणी, चिकोडी, रायबाग,  गोकाक, हुक्केरी परिसरात उत्पादीत  होणारा तंबाखू करून बिडीसाठी वापरला जातो.

या चारही तालुक्यात अनेक गावे  तंबाखूसाठी नावाजली आहेत. त्यामध्ये निपाणी भागातील अकोळ परिसरात उत्पादन होणार्‍या तंबाखूचा सर्वाधिक वापर होतो. आजही या भागात तंबाखूचे अमाप उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षीपासून तंबाखू खरेदी-विक्रीवर जीएसटी लागल्याने यंदा मात्र पिकाचे उत्पादन घटणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 2025 पासून तंबाखू उत्पादन बंदीची हाक दिल्याने आतापासूनच उत्पादकांनी तंबाखू उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादन घटल्यास काही वावगे  ठरणार नाही. परिसरातील शेतकर्‍यांकडून तंबाखू पिकाचे उत्पादन घेताना पूर्वीपासून त्यामध्ये आंतरपीक घेतले जात आहे.सद्यस्थितीत पावसाने दिलेली  उसंत पाहता अद्याप शिवारात खरिपातील  सुमारे 50 टक्के क्षेत्रावरील पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

कारखान्यांकडून होणारी ऊसतोडणीची हेळसांड व ऊस तोडणीसाठी लागणारा वेळ पाहता आंतरपीक घेण्याच्यादृष्टीने तंबाखूचे उत्पादन वाढू शकते. पण गेल्या 20 वर्षापासून तंबाखू उत्पादनात  होत असलेली घट पाहता जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू उत्पादन बंदीला हाक देणारी ठरली आहे.