Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Belgaon › ‘दूधगंगा कृष्णा’ निवडणूक बिनविरोध

‘दूधगंगा कृष्णा’ निवडणूक बिनविरोध

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:09PMचिकोडी : प्रतिनिधी

दूधगंगा कृष्णा साखर कारखान्याच्या संचालक  मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी विरोधी गटातील सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.     

दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक  मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे यांनी दिली. शनिवारी कारखाना स्थळावर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी विरोधी गटातील सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यांने सत्ताधारी गटातील सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली. 

निवड झालेल्या संचालक मंडळांची नांवे पुढीलप्रमाणे ः ऊस उत्पादन अ गटातून अजित देसाई (येडूर), अमित कोरे (अंकली), अण्णासाहेब जोल्ले (एकसंबा), बाळगौडा रेंदाळे (केरुर), भरतेश बनवणे (नसलापूर), चेतन पाटील (सदलगा), महांतेश  कवटगीमठ (चिकोडी), महावीर मिर्जे (चिकोडी), मल्लाप्पा म्हैशाळे (डिगेवाडी), मल्लिकार्जुन कोरे (अंकली), परसगौडा पाटील (जुगूळ), रामचंद्र निशानदार (भिरडी), रोहन उर्फ संदिप पाटील (भोज), सुभाष कात्राळे (शिरगुप्पी), तात्यासाहेब काटे (सौंदती). तर बिन ऊस उत्पादक ब व ड गटातून नंदकुमार  नाशिपुडी(नेज) यांची निवड झाली. 

कारखान्याच्या 16 जागांसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 22 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे निवृत्त अधिकारी आर.एस.नूली यानी काम पाहिले. 

सभासद  संचालक मंडळाच्या पारदर्शक व्यवहारामुळे संचालक मंडळाची निवड सलग दुसर्‍यांदा बिनविरोध झाली आहे. कारखान्यातर्फे सभासदांसाठी अनेक महत्वांकाक्षी योजना राबविण्यात आल्या आहेत. साखर उद्योग संकटात असतानाही सभासदांच्या उसाला योग्य भाव देण्यात आला आहे. संकटकाळी मदतीचा हा देण्यात आला आहे. कारखान्याचा पारदर्शक व काटकसरीचा असावे,याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले. 

अध्यक्ष अमित कोरे म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले, मागील सामान्य सभेत निर्णय घेतल्याप्रमाणे कारखान्याचे संस्थापक भ चिदानंद बसवप्रभू कोरे असे कारखान्याचे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.