Tue, Oct 22, 2019 02:33होमपेज › Belgaon › रसिकांच्या पाठबळातूनच बेळगावची रंगभूमी सशक्‍त बनेल

रसिकांच्या पाठबळातूनच बेळगावची रंगभूमी सशक्‍त बनेल

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 9:02PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावला नाट्यपरंपरा आहे. नाट्यरसिक दर्दी मानले जातात. मात्र त्या मानाने परिसरात नाट्य चळवळीला बळ मिळालेले नाही. अ. भा. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणूक रिंगणात आहे. नाट्य परिषदेच्या माध्यमातून राजकारण करण्याऐवजी कलावंत व रसिकांसाठी सेवारत राहणे माझे ध्येय आहे. बेळगावच्या नाट्यसृष्टीला बळ देण्याचे काम  करणार असल्याचे नाट्यकर्मी वृषाली मराठे यांनी सांगितले. 

रविवार 4 रोजी परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक आहे. बेळगावातून तिघांनी उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये मराठे आहेत. त्या म्हणाल्या, 25 वषार्ंपासून बेळगावच्या नाट्यसृष्टीत माझा सहभाग आहे. अनेक नाटकांमध्ये कामे केली. नाटक निर्मिती केली. पारितोषिके पटकावली. पं. रमाबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मी रमा’ या एकपात्री नाटकाचे प्रयोग केले. शारदोत्सव महिला समितीच्या मुख्यकार्यवाह म्हणून काम केले आहे.  वरेरकर नाट्य संघाच्या मंदावलेल्या कार्याला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गायन, चित्रकलेची आवड आहे. या कलांमुळे नाटकांना आवश्यक नेपथ्य, संगीत, वेशभूषेची उत्तम जाण आहे. जागतिक कविसंमेलनात भाग्य घेण्याची संधी मिळाली. वडगाव, आदर्शनगर, अनगोळ, शहापूर भागातील विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा धर्तीवर बससेवा सुरू केली होती.  

तरुण कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. कलाकारांना सराव आणि तालमीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करेन. वादविवादाऐवजी सुसंवादातून चांगला मार्ग निघू शकतो. परिषदेच्या बालरंगभूमीचे काम बेळगावात सुरू करायचे आहे. बेळगावात सुसज्ज नाट्यगृह निर्माण करून रसिकांना कमी दरात दर्जेदार नाटके पाहता यावीत, वृध्द कलावंतांना मानधन, गंभीर आजारीपणात मदत परिषदेमार्फत देण्यासाठी प्रयत्न राहील,  असेही  त्या म्हणाल्या.  
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19