Mon, May 27, 2019 00:44होमपेज › Belgaon › ड्रेनेजलाईन, रस्त्यांची समस्या कायम 

ड्रेनेजलाईन, रस्त्यांची समस्या कायम 

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 8:00PMबेळगाव : प्रतिनिधी

अनगोळमधील वॉर्ड क्रं 4 मध्ये बाबले गल्ली, नाथ पै नगर, जाधव कॉलनी, रामनगर, लोहार गल्ली, भांदूर गल्ली, हनमण्णवर गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, सुभाष गल्ली व  मारुती गल्लीचा सामावेश आहे. या वॉर्डात 24 तास पाण्याची सोय असून जाधव कॉलनी व रामनगरात नागरी समस्या कायम आहेत. सुमारे 18 लाख खर्च करुन बांधलेली सार्वजनिक शौचालये उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहेत.

आतापर्यंत सात कोटीची विकासकामे या वॉर्डात राबविण्यात आली आहेत. अजून एक कोटीची विकासकामे राबविण्यात येणार असून ती पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. या वॉर्डात ड्रेनेज समस्या कायम असून सखल भाग असल्याने ही समस्या निकालात काढण्यासाठी नियोजन सुरु आहे. तलावातील जलपर्णी काढण्याची आवश्यकता असून तलावाच्या शेजारी चौथरा बांधण्यात आला असून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे नियोजन आहे.

जाधव कॉलनीत रस्ते नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत.  त्यामुळे डासांची पैदास वाढली असून डेंग्यूचा एक रुग्ण देखील आढळून आला होता. या वॉर्डात आरक्षण इतर मागासवर्गीय अ महिलासाठी होते. आता सामान्य खुला असे आहे.

वॉर्ड क्र. 4 : मराठी मतदारांचा वॉर्ड

वॉर्ड क्रमांक 4 हा मराठी मतदार वॉर्ड म्हणून ओळखला जातो. या वॉर्डात 24 तास पाण्याची सोय आहे. 2013 च्या निवडणुकीत 7 हजार 600 मतदार होते. यंदा 9 हजार 800 मतदार आहेत. त्यामुळे 2 हजार 200 मतदारांची नव्याने भर पडली आहे. ही मते युवावर्गाची आहेत. यंदा सामान्य खुला वर्गासाठी राखीव आहे. 

असा आहे वॉर्ड

अनगोळमधील बाबले गल्‍ली, नाथ पै नगर, जाधव कॉलनी, रामनगर, लोहार गल्‍ली, भांदूर गल्‍ली, हनमण्णवर गल्‍ली, कलमेश्‍वर गल्‍ली, लक्ष्मी गल्‍ली, पाटील गल्ली, सुभाष गल्‍ली, मारुती गल्‍ली

मंजूर निधी

मारुती गल्ली गटार रोड : 1 कोटी 75 लाख 

हण्णमन्नवर रोड : 20 लाख

भांदूर गल्ली पेव्हल ब्लॉक : 40 लाख

बाबले गल्ली व भांदूर गल्ली गटार : 40 लाख

नाथ पै नगर गटार : 20 लाख

गणपती विसर्जन कुंड : 40 लाख

जाधवनगर सिंमेट रोड : 25 लाख

नाथ पै नगर, भांदूर गल्ली ड्रेनेज लाईन : 60 लाख

सार्वजनिक शौचालये : 18 लाख

तलावाचा विकास : 30 लाख