Wed, Nov 21, 2018 23:31होमपेज › Belgaon › डॉ. योगेश जाधव यांचा सत्कार

डॉ. योगेश जाधव यांचा सत्कार

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 12:02AMनिपाणी : प्रतिनिधी 

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची निवड झाल्याबद्दल निपाणीवासीयांच्या वतीने शनिवारी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार यांनी कोल्हापूरमध्ये त्यांचा सत्कार केला.

महाराष्ट्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वी डॉ. योगेश जाधव यांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्ती केल्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण सीमाभागासाठी समाधानाची बाब ठरल्याचे मत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार यांनी व्यक्त केले. दादाराजे यांनी हस्ते डॉ. योगेश जाधव यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. डॉ. योगेश जाधव यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत तारळे, प्रा. डॉ. भारत पाटील उपस्थित होते.