Mon, Mar 25, 2019 18:13होमपेज › Belgaon › डॉ. निंबाळकरांचा अर्ज मिरवणुकीने सादर

डॉ. निंबाळकरांचा अर्ज मिरवणुकीने सादर

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 11:59PMखानापूर : वार्ताहर

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी शुक्रवार खानापूर निवडणूक अधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोषी मिरवणूक काढली.खानापूरची ग्रामदेवता चौराशीदेवी मंदिरापासून, रवळनाथ देवस्थान, विठ्ठल देवस्थान, महालक्ष्मी मंदिराला भेट देवून संत बसवेश्‍वर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत शिवस्मारक चौकात कॉर्नर सभा घेतली. त्यानंतर निवडणुक अधिकारी सी.जी.बाळकृष्ण यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर बोलताना केपीसीसी चे प्रधान सचिव पी.व्ही.मोहन म्हणाले, डॉ. निंबाळकर यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. खर्‍या खर्थाने तालुक्याच्या कानाकोपर्‍यात काँग्रेस पक्ष पोहचविण्याचे कार्य त्यांच्याकडून झाले. पक्षाने त्यांच्या मोठी जबाबदारी दिली आहे. त्या ती समर्थपणे पार पाडतील, असा विश्‍वास आहे. 

तालुक्यातील जनतेने त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अशोक अंगडी यांनी केले. ग्रामीण अध्यक्ष देमान्ना बसरीकट्टी, चंबान्ना होसमणी, डी.आर.जोरापूर, अभिषेक होसमणी, विनायक पाटील, यल्लापा चिनवाल,  अरुण बेळगावकर, गोपाळ नाईक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेले काही दिवस तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. त्यात अपेक्षेप्रमाणे डॉ. निंबाळकर यांनी बाजी मारली होती. तर शुक्रवारी भाजपने विठ्ठल हलगेकर यांची उमेदवारी जाहीर केली. तर विलास बेळगावकर आणि अरविंद पाटील हेही रिंगणात आहेत.

Tags : Belgaum, Dr, Nimbalkar, application,  filed,  procession