Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Belgaon › अंधश्रद्धा टाळा, आरोग्य सांभाळा

अंधश्रद्धा टाळा, आरोग्य सांभाळा

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMउचगाव : वार्ताहर

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी वेळोवेळी काळजी घेऊन आरोग्य जपले पाहिजे. अंधश्रध्देच्या जाळ्यात न अडकता योग्य आहार, व्यायाम आणि वेळोवेळी डॉक्टरी सल्ला, उपचार महत्त्वाचे आहेत, असे मत डॉ. अर्पिता यांनी व्यक्त केले.

उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिरामध्ये सरकारी नर्सिंग महाविद्यालय बेळगाव यांच्या विद्यमाने आरोग्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.या शिबिरात कृष्ठरोग व क्षय रोगाची माहिती पथनाट्याद्वारे देण्यात आली. शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा योगिता देसाई होत्या.

समारंभाला ग्रा.पं. उपाध्यक्ष शिवाजी कुरबूर, सदस्य भास्कर कदम पाटील, शीतल सुर्वे आदी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रज्ञा, प्राचार्या उषा भंडारी, रुपा काळे, एन. ओ. चौगुले, प्रा. प्रकाश यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दोन पथनाट्य सादर करून कुष्ठरोग व क्षयरोग यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.

शिबिराच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आरोग्याची माहिती देणारी विविध मॉडेल्स बनवून ठेवली होती. प्रदूषणामुळे होणार दुष्परिणाम, आहार पध्दती, उपचार पध्दती, घराची स्वच्छता, स्वच्छ पाणी, गटारी, शौचालय, याविषयी प्रतिकृती मांडून माहिती देण्यात येत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रध्दा प्रभाकर बसनाईक यांनी केले. रोहित कांबळे यांनी आभार मानले.