Tue, Nov 13, 2018 08:27होमपेज › Belgaon › बंडखोरांकडे बघूही नका : प्रा. एन. डी. पाटील

बंडखोरांकडे बघूही नका : प्रा. एन. डी. पाटील

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:13AMबेळगाव ः प्रतिनिधी

मराठी मतदारांनी आपला कौल अधिकृत उमेदवारालाच द्यावा. मतदानाच्या माध्यमातून लोकेच्छा प्रकट करा, बंडखोरांकडे बघूही नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. या निवडणुकीत सीमावासीयांची कसोटी लागणार आहे. या निर्णायक क्षणी प्रत्येक मराठी भाषिकाचे मत मध्यवर्ती म. ए. समिती उमेदवारालाच मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 मध्यवर्ती म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांच्या कॉलेज रोडवरील , तर प्रकाश मरगाळे यांच्या गोवावेस येथील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करून प्रा. पाटील बोलत होते.प्रा. पाटील म्हणाले,  सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात ऐरणीवर आला आहे. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवावी लागेेल. तर दुसरीकडे न्यायालयीन कामकाजदेखील जोमाने करावे लागणार आहे. यामध्ये लोकेच्छा हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे.आजपर्यंत सीमाबांधवांनी समितीला साथ दिली आहे. मध्यंतरी मतभेदामुळे काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला; पण मराठी भाषिक शहाणे झाले आहेत.सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, मराठी माणूस स्वाभिमानी आहे. भूलथापाना बळी न पडता समिती उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा.

एकीसाठी आम्ही प्रयत्न केले. पण प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे ‘मध्यवर्ती’च्या पाठीशी रहा, असे  आवाहन प्रा. पाटील यांनी केले.