Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दंडुका दाखविताच अधिकारी नरमला

दंडुका दाखविताच अधिकारी नरमला

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 8:38PMमच्छे : वार्ताहर       

केंद्र सरकारकडून मिळणारी तिचाकी (ट्रायसिकल)वाहन उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍याला एका दिव्यांगाने हातातील दंडुका दाखवून जाब विचारताच नरमलेल्या अधिकार्‍याने काही तासातच तिचाकी वाहन उपलब्ध करून दिली. पिरनवाडी येथे सोमवारी घडलेल्या या प्रकाराची गावात दिवसभर चर्चा सुरू होती.

हुंचेनट्टी येथील नारायण बस्तवाडकर या दिव्यांगाने आपल्या तिचाकी वाहनासाठी केंद्र सरकारकडे ऑनलाईनमार्फत अर्ज दाखल केला होता. केंद्राने बस्तवाडकर यांना तिचाकी वाहन मंजूर केले होते.जिल्ह्यातील अनेक  दिव्यांगांना जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तिचाकी वाहनांचे वितरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.  काही दिव्यांगांना ते वितरण करण्याचे बाकी होते. अशांना  आज या, उद्या या, साहेब   आज येत  नाहीत, असे सांगण्यात येत होते.

त्यामुळे दिव्यांगांची फरफट सुरू होती. दिव्यांग बस्तवाडकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या बस्तवाडकर यांनी दिव्यांग कल्याण खात्याच्या अधिकार्‍यांची थेट भेट घेऊन हातातील दंडुका घेऊन जाब विचारताच नरमलेल्या अधिकार्‍याने केवळ सहा तासांत बस्तवाडकर यांच्याकडे तिचाकी वाहन सुपूर्द केले.