Sun, Apr 21, 2019 14:31होमपेज › Belgaon › विविध स्पर्धा, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप

विविध स्पर्धा, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 8:20PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणीसह परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध स्पर्धा, वृक्षारोपण तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप असे उपक्रम राबविण्यात आले.

येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात  स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित वक्‍तृत्त्व स्पर्धेत प्रतिक्षा सूर्यवंशी, ऐश्‍वर्या वनवाडे, कावेरी दिवटे, रांगोळी स्पर्धेत अपूर्वा कमते, किर्ती पाटील, सुचिता सपकाळ, कनिष्ठ महाविद्यालय वक्‍तृत्त्व स्पर्धेत आर्या नागराळे, ग्रिष्मा बुर्ज, अभिषेक अंबी, राज शहा, रांगोळी स्पर्धेत नियोगिता पाटील, सृष्टी पाटील, सुप्रिया सुतार यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविला.

मॉडर्न इंग्लिश स्कूल

येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये  सेवानिवृत नेव्ही अधिकारी बी. के. शिवण्णावर, कमिटी अध्यक्ष दिलीप पठाडे, प्राचार्य निळकंठ देसाई व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्राचार्या स्नेहा घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली शिवण्णावर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

सरकारी वसतिगृह

येथील भीमनगरातील सरकारी वसतिगृहामध्ये वरिष्ठ पर्यवेक्षिका शशिकला सवदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संजय चौगुले, अनिल हुल्याळ, सुरेश चौगुले, सदानंद जयकर, महांतेश पाटील, बसवराज पाटील आदी उपस्थित होते.

मराठा मंडळ

येथील मराठा मंडळ हायस्कूल, सांस्कृतिक भवन व एच. व्ही. के. मराठी विद्यानिकेतनमध्ये संयुक्‍त स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. माजी डीवायएसपी वसंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राजेश कदम आदी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्‍वर सौहार्दतर्फे वृक्षारोपण

अकोळ रोडवरील महात्मा बसवेश्‍वर सौहार्द शाखेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थापक डॉ. सी. बी. कुरबेट्टी, चेअरमन श्रीकांत परमणे, व्हा. चेअरमन प्रताप पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

मांजरी परिसर

मांजरी : वार्ताहर

येथील ग्रामपंचायत प्रांगणात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये ग्रा. पं. अध्यक्षा सुनीता भोजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. साई सोसायटीत अशोक दणकाई, शिवाजी क्रेडिट सोहार्दमध्ये इंद्रजीत घोरपडे, प्राथमिक कृषीपत्तीन संघामध्ये परशराम पवार, लिबरल सोसायटीत चंद्रकांत इंगळे, शेडबाळ अर्बन बँकेत सुभाष तोरसे,  लक्ष्मी सौहार्दमध्ये वसंत सुळकूडे, जय किसान सोसायटीचे वसंत यादव, जय हनुमान दूध संघ व जय हनुमान सोसायटीत परशराम पवार, शांतीसागर क्रेडिट सौहार्दमध्ये श्रीकांत खटकोळे, आझाद को-ऑप. मध्ये बसाप्पा कोकणे, लक्ष्मी क्रेडिटमध्ये अध्यक्ष जिन्नाप्पा शेडबाळे, कर्नाटक विकास ग्रामीण बँकेत व्यवस्थापक बी. एच.  कुलकर्णी,  प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. एन. मोहिते, सरस्वती महिला सोसायटीत पांडुरंग माने, सर्वोदय हायस्कूलमध्ये अध्यक्ष एन. एम. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

स्वातंत्र्य सैनिक संघ

क्रांती चौक येथे स्वातंत्र्य सैनिक संघातर्फे ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक पायगोंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अर्जुन वाडकर  यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन झाले. यावेळी माजी आमदार के. पी.  मग्गेण्णावर,  माजी जि. पं. सदस्य पांडूरंग माने, ता. पं. सदस्य प्रभाकर भिमण्णावर, ग्रा. पं. उपाध्यक्ष बबन भिलवडे आदी उपस्थित होते.

कोगनोळी परिसर

कोगनोळी : वार्ताहर

येथील सरकारी शाळेत ग्रा. पं. उपाध्यक्ष दगडू नाईक, मराठी शाळेत जि. पं. सदस्य जयवंत कांबळे, ग्रा. पं.  कार्यालय येथे ग्रा. पं. अध्यक्षा आक्काताई डूम, कोगनोळी हायस्कूल येथे ता. पं. सदस्य प्रीतम पाटील, न्यू इंग्लिश मॉडर्न स्कूल, हालसिध्दनाथ पतसंस्था येथे उमेश करे, दत्तगुरु पतसंस्था येथे प्रकाश पाटील, जनता पतसंस्था येथे पद्मराज माणगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हालसिध्दनाथ पतसंस्थेसमोर ध्वजारोहणानंतर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांजपथक सादर केले. 

कुन्‍नूर परिसर

कुन्नूर : वार्ताहर

ग्रा. पं. समोर ग्रा.पं. अध्यक्षा सुजाता सासमिले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. हनुमान मंदिरसमोरील ग्रा.पं. सदस्य सर्जेराव पाटील, गोपाळकृष्ण दूध संघात अध्यक्ष बाजीराव पाटील, भैरवनाथ क्रेडिटसह संस्थेत संचालक आण्णासो मगदूम, संगमेश्‍वर दूध संघामध्ये चेअरमन विठ्ठल जाधव, कुन्नूर क्रेडिट संस्थेत चेअरमन सुभाषराव जाधव, ग्रामसेवा सोसायटीत चेअरमन विद्यासागर उपाध्ये, श्रीराम क्रेडिट सोसायटीमध्ये चेअरमन रामचंद्र करडे, महात्मा बसवेश्‍वर संस्थेत चेअरमन बाळासो जाधव, महालक्ष्मी क्रेडिट सौहार्दमध्ये चेअरमन शरदचंद्र पाठक, बिरेश्‍वर क्रेडिट संस्थेत शिवाजी जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.गजबरवाडी दूध संघामध्ये भारतीय सैनिक सूरज खोत, मराठी शाळेत सुजाता सासमिले, कुन्नूर हायस्कूलमध्ये एच. एस. खाडे तर मराठी शाळेत ए. पी. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

जत्राट परिसर
जत्राट : वार्ताहर

प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघामध्ये रघुनाथ जबडे, लोककल्याण सौहार्द संस्थेमध्ये गावकामगार शशिकांत पाटील, बोरगाव अर्बन संस्थेमध्ये संतोष शिरोळे, अरिहंत सहकारी संस्थेमध्ये संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. 

वेदगंगा दूध संस्था व महालक्ष्मी मल्टीपर्पजमध्ये प्रशांत पाटील, महात्मा बसवेश्‍वर संस्था व त्रिमूर्ती मल्टीपर्पज संस्थेमध्ये अशोक चेंडके, जत्राट मराठी, कन्नड व ऊर्दू शाळेमध्ये एम. पी. पाटील व रमेश भिवशे, जत्राट ग्रा. पं. चावडीसमोर सिध्दू नराटे, ग्रा. पं. मध्ये निलम जबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शाळेमध्ये देशभक्‍तीपर गिते, वक्‍तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोळ परिसर

अकोळ : वार्ताहर

अकोळ हायस्कूल अकोळ येथे माजी सैनिक बंडाभाऊ बामणे, संगोळ्ळी रायण्णा हायस्कूलमध्ये लक्ष्मणराव चिंगळे, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात  डॉ. शितल कुलकर्णी, मराठी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सुरेश जाधव, मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवाजी शितोळे, मराठी मुलांच्या शाळेत राजू चव्हाण, पार्श्‍वमती कन्या विद्यालयात अशोक व्हनशेट्टी, ग्रा. पं. कार्यालयात संजय पिसाळ, बसवेश्‍वर बँक  येथे विलास कुरळूप्पे, बोैध्द नगरमध्ये प्रकाश गुडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.बौध्दनगर शाळेत मुलांना दूध वाटप करुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक कला गणेश मंडळातर्फे मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे  वाटप करण्यात आले.a