Wed, Feb 20, 2019 00:28होमपेज › Belgaon › धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासास प्रारंभ

धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासास प्रारंभ

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 17 2018 11:25PMबेळगाव : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने  शुक्रवारी (दि. 16) सकाळी 6.30 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक व पूजन करून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी लिहिलेल्या संभाजी ‘सूर्यहृदय’ या श्‍लोकाचे पठण करण्यात आले.

दि. 16 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत (फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणाबरोबरच सुतक पाळण्यात येणार आहे.  जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी बलिदान मासाचे महत्व, बलिदान मास का आणि कसा पाळावा, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कराड येथील धारकरी ओंकार माने व सागर ढवळे यांच्या अपघाती निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शहर कार्यवाह विश्‍वनाथ पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, विजय कुंटे, प्रमोद कंग्राळकर, अमोल केसरकर आदी उपस्थित होते.