Fri, Sep 21, 2018 09:29होमपेज › Belgaon › नशीब बलवत्तर म्हणून...

नशीब बलवत्तर म्हणून...

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 18 2018 12:19AM 

संकेश्‍वर (प्रतिनिधी ) : वेळ सकाळी 10.30... पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याकडे कंटेनर निघाला होता. अचानक मोठा आवाज झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वेगाने ट्रक रस्ता सोडून  दुसर्‍या बाजूच्या सर्व्हिस रोडवर येऊन थांबला. सुदैवानेे यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. त्यामुळे दुर्घटना टळली. ही घटना सोलापूर (ता. हुक्केरी) फाट्यावर घडली.या घटनेत वाहनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. शिवाय चालकालाही  काही दुखातप झाली नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त करण्यात आल्या.

 

Tags : Destiny as mighty .,belgaon news..