Wed, Nov 14, 2018 02:33होमपेज › Belgaon › कुन्‍नूर मराठी शाळेत नासधूस

कुन्‍नूर मराठी शाळेत नासधूस

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 11:49PMकुन्‍नूर : वार्ताहर

येथील सरकारी मराठी शाळेच्या वर्गखोल्यांची मोडतोड केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. समाजकंटकांनी क्रीडा साहित्यासह पाठ्यपुस्तकांची नासधूस  केली आहे. तसेच वर्गात शौचही करण्यात आले आहे. दरवाजांची मोडतोड करण्यात आली असून, शाळेच्या आवारातील झाडे उपटून टाकण्यात आली आहेत.

पालकांसह ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्‍त केला असून, समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तथापि, सायंकाळपर्यंत या प्रकरणाची अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती. एसडीएमसीने तातडीने पोलिसांत तक्रार करावी, अशी मागणी होत आहे.