Sat, Mar 23, 2019 02:27होमपेज › Belgaon › इंग्रजीसह सर्व फलकांवर कन्‍नडसक्‍तीसाठी कायदा

इंग्रजीसह सर्व फलकांवर कन्‍नडसक्‍तीसाठी कायदा

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 10:44PMबंगळूर : प्रतिनिधी

यंदाच्या कर्नाटक राज्योत्सवापर्यंत दुकाने, खासगी संस्थांवरील इंग्रजीतील फलकांवर कन्‍नडची सक्‍ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत यासंबंधीचा कायदा अस्तित्वात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी ट्वीट केले आहे.

बंगळूरसह राज्यातील अनेक ठिकाणी दुकाने आणि संस्थांच्या इमारतींवर केवळ इंग्रजीत फलक लावण्यात आले आहेत. ऑक्टोबरपर्यंत त्या फलकांवर कन्‍नड भाषेतही मजकूर असावा किंवा नाव असावे, अशी सक्‍ती केली जाणार आहे. कन्‍नडचे स्थान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे परमेश्‍वर यांनी म्हटले आहे.