Wed, Apr 24, 2019 15:37होमपेज › Belgaon › इव्हीएम, व्हीव्हीपॅटची कंग्राळीत प्रात्यक्षिके

इव्हीएम, व्हीव्हीपॅटची कंग्राळीत प्रात्यक्षिके

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच इव्हीएम-व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. मतदारांनी दिलेले मत कोणाला गेले, हे  माहीत व्हावे, यामध्ये संशय निर्माण होऊ नये, यासाठी मतदारसंघनुसार बूथपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. कंग्राळी बी. के. येथे निवडणूक  अधिकार्‍यांकडून जनजागृती करण्यात आली. 

कंग्राळी बी. के. येथे नागरिकांना यंत्राबाबत प्रात्यक्षिके दाखवून माहिती देण्यात आली. मतदान कोणाला केले, याची माहितीव्हीव्हीपॅट यंत्राद्वारे सात सेकंदात मिळू शकते. याची पावती मतदारांना देण्यात येईल. ती व्हीव्हीपॅटद्वारे संग्रहित करण्यात येणार आहे. यानंतरही मतदारांना संशय निर्माण झाल्यास तक्रार दाखल करून एजंटसमोरच ‘टेस्ट व्होट’ करण्याची संधी मिळेल. मतदारांनी दाखल केलेली तक्रार खोटी ठरल्यास शिक्षाही होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. 

मतदानासंदर्भातील आवश्यक माहिती तात्काळ मिळणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेत कोणत्याच प्रकारचा गैरव्यवहार होणार नसल्याचे स्पष्ट झालेे. या प्रक्रियेसंदर्भातील माहिती मतदारांना प्रात्यक्षिके दाखवून देण्यात आली. यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी नोडल अधिकारी एन. डी. नाईक, गावतलाठी उदय खातेदार, पीडीओ कल्याणी चौगुले आदी उपस्थित होते. 
 

Tags : Demostaction, Evm, vvpat, machin, kangaroli, belgaon news