Thu, Jul 18, 2019 06:29होमपेज › Belgaon › कन्नड नामफलक आदेश मागे घेण्याची मागणी

सिद्धरामय्यांच्या वक्तव्याचा निषेध

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 12:48AMबेळगाव : प्रतिनिधी

नोव्हेंबरपूर्वी बेळगाव परिसरातील दुकानांचे फलक कन्नडमध्ये लावण्याचा आदेश देणार्‍या कन्नड भाषा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रा. सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा तालुका म. ए. समितीने निषेध केला. आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी कॉलेज रोडवरील कार्यालयात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी निंगोजी हुद्दार होते. यावेळी उपरोक्त निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रा. सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या बैठकीत बेळगावमधील दुकाने आणि व्यापारी आस्थापने यांचे फलक कन्नड भाषेत लावण्याचे आदेश दिले आहेत. कन्नड फलक नसल्यास परवाना नूतनीकरण करू नये, असे बजावले आहे. हा मराठी भाषकांवर अन्याय आहे. व्यापारी आपल्या ग्राहकाला समजेल अशा दृष्टीने मराठीतून फलक लावतात. यामध्ये व्यापार्‍यांचा फायदा आहे. शहरात मराठी भाषकांची संख्या अधिक आहे. त्यांना समजण्यासाठी मराठीतून फलक आहेत. ते हटविल्यास मराठी जनता स्वस्थ बसणार नाही. यामुळे प्रा. सिद्धरामय्या यांनी आपला आदेश मागे घेण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्याचा निषेधही व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, एस. एल. चौगुले, ता. पं. सदस्य रावजी पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, कृष्णा हुंदरे, ईश्‍वर गुरव, बी. एस. पाटील, कल्लाप्पा घाटेगस्ती, आर. आय. पाटील, आर. सी. मोदगेकर आदी उपस्थित होते.