Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Belgaon › जुनीच मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी

जुनीच मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 01 2018 7:38PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी मतदान प्रक्रिया जुन्याच पध्दतीवर आधारित राहावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान झाले. व्हीव्हीपॅटच्या साहाय्याने मतदान करणार्‍याला त्याने मतदान कोणत्या उमेदवारला केले आहे, ते पाहण्याची सेवा उपलब्ध करुन दिली. या सर्व बाबी चांगल्या असल्यातरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात दोष असल्यास मतदान केल्यानंतर ते आपण केलेल्या उमेदवारला मतदान झाले आहे का याबाबत शंका येते.

त्यासाठी पूर्वीप्रमाणे मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची प्रक्रिया योग्य आहे. त्याचा वापर भविष्यात होणार्‍या मतदानात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर अब्दूल शेख, अमीर तालीकोटी, एस. बी. बामणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.