Sun, Mar 24, 2019 06:21होमपेज › Belgaon › कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी

कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 8:45PMजमखंडी : वार्ताहर

जमखंडी तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले असून या भागात पाण्याची समस्या उद्भवली आहे. तरी महाराष्ट्रातील कोयना धरणातून कृष्णा नदीत त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांतर्फे असि. कमिशनर एम. पी. मारुती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 

गेल्या महिन्यापासून कृष्णा नदी पात्र कोरडी पडू लागली होती. अधिकारी व राजकारणी निवडणुकीत व्यस्त  झाल्याने पाणी समस्येकडे दुर्लक्ष   झाले असून आता समस्या गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला. तरी राज्य सरकारने महाराष्ट्र सरकाशी त्वरित संपर्क साधून 2 ते 3 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नदीत पाणी सोडण्यात आले नाही तर आंदोलन छेडण्याचा  इशारा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेसाब मसळी, कुतबुद्दीन अपराधी, अयुब गदग, महमद खाद्री, फक्रुद्दीन करणासी, रामू शिक्कलगार, साहेबलाल नदाफ आदी उपस्थित होते.