Thu, Oct 17, 2019 03:17होमपेज › Belgaon › पदवीपूर्व प्राध्यापक वेतनापासून वंचित

पदवीपूर्व प्राध्यापक वेतनापासून वंचित

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:34PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील पदवीपूर्व महाविद्यालयातील 158 महाविद्यालयांमधले प्राध्यापक दोन  महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. पदवीपूर्व शिक्षण कार्यालयातील सावळागोंधळ  कारणीभूत असला तरी केवळ बजेटचे कारण  दिले जात आहे. 

पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन  प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत होत होते. मात्र गेल्या महिन्यापासून वेतन देण्यामध्ये सातत्याने चालढकल सुरू आहे. प्राध्यापक सातत्याने पदवीपूर्व शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयामध्ये येरझार्‍या मारत असले तरी त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची माहिती काही प्राध्यापकांनी दिली. 

शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांची वाणवा आहे. एकाच व्यक्‍तीवर अनेक कामे सोपविली जात आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांमुळे बारावीच्या परीक्षा तातडीने घेण्यात येणार आहेत. ती तयारी सुरू झाल्यामुळे प्राध्यापकांच्या वेतनाची सविस्तर माहिती ट्रेझरी कार्यालयाला जाण्यास विलंब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  पण त्यामुळे प्राध्यापकांतून नाराजीचा सुरू उमटत आहे.