Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Belgaon › डीएड कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर?

डीएड कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर?

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 7:57PMबेळगाव : प्रतिनिधी

शिक्षक भरतीस विलंब, तांत्रिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आणि सरकारच्या काही धोरणांमुळे जिल्ह्यातील 71 डीएड महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.  उर्वरित 13 महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. 

सहा वर्षापूर्वी जिल्ह्यात 84 डीएड महाविद्यालये होती. यापैकी आता चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 5 व बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 8 डीएड महाविद्यालये आहेत. सन 2012-13 च्या शैक्षणिक वर्षात चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 40 आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 22 डीएड महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. 

आठ वर्षापूर्वी डीएड महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी वशिलेबाजी लागायची. त्यावेळी डीएड महाविद्यालयांनी डोनेशनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून उकळले जायचे. बिदर, निपाणी, कित्तूर आदी ठिकाणचे विद्यार्थी हमखास नोकरीमुळे डोनेशन मोठ्या प्रमाणात संस्थाचालकांना देत होते. त्यामुळे डीएड महाविद्यालये काढण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. डीएड महाविद्यालये बंद होण्यासाठी सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. प्राथमिक शाळेत 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गात डीएडधारकांना प्राधान्य दिले. 6 वी ते 8 वी पर्यंच्या वर्गासाठी बीएड पदवीधरकांची नेमणूक सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात डीएडधारकांची भरतीच केली  नाही.  टीईटी व सीईटी घेण्यात सरकार वेळ काढत आहे. निकालातही  गोंधळ सुरू आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल थंडावला.

शुल्क भरतो, प्रवेश घ्या

डीएडसाठी शुल्क मोठ्या प्रमाणात उकळले जात होते. मात्र सध्या पाच ते दहा हजार रूपये शुल्क आहे. तर काही प्राध्यापकांवर शुल्क आम्ही भरतो. प्रवेश घ्या, अशी ऑफर देण्याची वेळ आली आहे.  उर्वरित महाविद्यालयांतून वर्षाला 25 ते 30 विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. भविष्यात हीच स्थिती राहिल्यास महाविद्यालये बंद करण्याची वेळ येणार आहे.