Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Belgaon › तालुका विभाजनामुळे सर्कलमध्ये घट

तालुका विभाजनामुळे सर्कलमध्ये घट

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:00PM

बुकमार्क करा
निपाणी : महादेव बन्‍ने

निपाणी तालुका निर्मितीची फाईल शासनाकडे गेल्यानंतर आता चिकोडी तालुक्याचे विभाजन निश्‍चित झाले आहे. त्यामुळे यापूर्वी 4 महसूल सर्कलमध्ये असणारा हा तालुका आता विभागला जाणार आहे. त्यानुसार निपाणी तालुक्यात निपाणी व सदलगा सर्कलमधील काही गावे तर चिकोडी तालुक्यात चिकोडी, नागरमुन्नोळी व सदलगा सर्कलमधील काही गावे जोडली जाणार आहेत.

नव्या निपाणी तालुक्यात निपाणी, सर्कलमधील कोगनोळी, हणबरवाडी, जत्राट, श्रीपेवाडी, लखनापूर, पडलिहाळ, शिरगुप्पी, पांगिरे बी, बुदलमुख, कोडणी, गायकनवाडी, शेंडूर, गोंदुकुप्पी, सौंदलगा, भिवशी, आडी, हंचिनाळ, कुर्ली, भाटनांगनूर, यरनाळ, अमलझरी, तवंदी, गवाण, आप्पाचीवाडी, मत्तिवाड, हदनाळ, सुळगांव, अकोळ, यमगर्णी, नांगनूर, बुदिहाळ, बेनाडी, बोळेवाडी सदलगा सर्कलमधील बोरगाव, बेडकिहाळ, सिदनाळ, कुन्नूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी, माणकापूर, हुन्नरगी, भोज, शिरदवाड, गळतगा, भीमापूरवाडी, दिलालपूरवाडी, हळदहट्टी, ममदापूर, कारदगा, ढोणेवाडी, बोरगाववाडी, कसनाळ, बारवाड, मांगूर ही गावे जोडण्यात येणार आहेत. 

नव्या चिकोडी तालुक्यामध्ये चिकोडी सर्कलमधील चिकोडी, केरुर, अंकली, मांजरी, इंगळी, येडूर, चंदूर, शिरगाव, गिरगाव, चिंचणी, नाईंग्लज, खडकलाट, पीरवाडी, पट्टणकुडी, वाळकी, चिखलव्हाळ, रामपूर, पांगिरे ए, हिरेकुडी, जोडकुरळी, काडापूर, कोथळी, नवलिहाळ, कुठाळी, संकनवाडी, सदलगा सर्कलमधील सदलगा, एकसंबा, कल्लोळ, नणदी, नागराळ, मलिकवाड, जनवाड, नीज, शमनेवाडी व नागरमुन्नोळी सर्कलमधधील नागरमुन्नोळी, बेळगली, जयनगर, विजयनगर, ममदापूर के. के., कब्बूर, बेळकूड, उमराणी, इटनाळ, करोशी, बंबलवाड, कुंगटोळी, बेन्नीहाळी, मुगळी, कमतेनहट्टी, वड्राळ, मजलट्टी, खजगौंडनहट्टी, जैनापूर, तोरणहळ्ळी, हत्तरवाट, मांगनूर, बिद्रोळी, करगाव, डोणवाड, हंचिनाळ के. के. ही गावे जोडली जाणार आहेत. या नव्या सर्कलनुसार आता निपाणी व तालुक्यातील महसूल विभागाचा  कारभार चालणार आहे.