होमपेज › Belgaon ›

भाजपच्या ‘व्होटबँके’मध्ये घट  : काँग्रेस
 

भाजपच्या ‘व्होटबँके’मध्ये घट  : काँग्रेस
 

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:43AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात भाजपविरोधी वातावरण असून भ्रष्टाचारविरहित काँग्रेसने कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळणार असल्याचे एआयसीसीचे सचिव तथा बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी खा. मणिकम टागोर  यांनी दिली.

चिकोडी जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात 16 ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले,  मोदींच्या लाटेतही राज्यात काँग्रेसला 40.5 टक्के तर भाजपला 43 टक्के मतदान झाले होते. अलिकडच्या काळात निवडणूक झालेल्या सर्वच राज्यांमध्ये भाजपच्या मतदानात 7 टक्के घट झाली आहे.जीएसटी, नोटबंदी, 15 लाख खात्यावर जमा करण्यासह अच्छे दिनाच्या फोल आश्‍वासनामुळे  राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे.  काँग्रेसला राज्यात यंदा 45 टक्क्याहून अधिक मतदान तर भाजपला 35 टक्क्यापर्यंत होईल असे ते म्हणाले.जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, घरोघरी काँग्रेससह विविध उपक्रम राबविल्याबद्दल आढावा बैठक घेऊन 16 ब्लॉक अध्यक्षांशी चर्चा करून रणनीतीसाठी सूचना केली आहे.

 Tags : Belgaon, Decrease, BJP,  Votabanke,  Congress