होमपेज › Belgaon › ‘लिंगायत धर्म’ निर्णय किमान ६ महिन्यांनंतर

‘लिंगायत धर्म’ निर्णय किमान ६ महिन्यांनंतर

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 08 2018 12:01AM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

लिंगायत समुदायाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी किंवा नाही, याबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने  कालावधी मागितल्यामुळे याबाबत निर्णय सहा महिन्यानंतरच होऊ शकणार आहे.

राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या सात सदस्यीय समितीची बैठक झाली. समितीला  अहवाल सादर करण्यास चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मोठी जबाबदारी असून विचार?विनिमय करून अहवाल तयार करावा लागणार असल्याने तो सादरीकरणासाठी सहा महिन्यांची मुदत मागण्याचा निर्णय झाल्याची माहिती समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास यांनी दिली. 

आतापर्यंत कर्नाटकाच्या अनेक भागात मोर्चे, आंदोलने झाली. वीरशैव हा लिंगायत समुदायातीलच एक पंथ असून, वीरशैवांना लिंगायतांमध्ये समाविष्ट करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी विविध मठाधीश व लिंगायत नेतेमंडळींनी केली आहे, तर काही जणांनी वीरशैवांची स्वतंत्र ओळख ठेवावी, अशीही मागणी केली आहे.

समितीचे काम काय?

लोकांकडून सूचना मागवणे
सूचनांचा अभ्यास करणे
लिंगायत हा स्वतंत्र धर्म होऊ शकतो की नाही, हा अहवाल देणे
पुढची बैठक 27 जानेवारीला
प्रस्ताव बंगळूर येथील अल्पसंख्याक कार्यालयाकडे पाठवण्याचे आवाहन