Sun, Aug 25, 2019 04:06होमपेज › Belgaon › अधिकारीवर्गाची तू तू मैं मैं...

अधिकारीवर्गाची तू तू मैं मैं...

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:39PMबेळगाव : प्रतिनिधी

नागरी समस्या निकालात काढण्यासाठी भाजपचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके व अभय पाटील यांच्या उपस्थितीत भरतेश कॉलेजमध्ये बुधवार 23 रोजी बैठक पार पडली. बैठकीत संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडल्या. यामुळे अधिकारीवर्गात एकमेकावर आरोप- प्रत्यारोप नाट्य बैठकीत रंगले. ‘तू तू मैं मैं’ मुळे नागरी समस्या निकालात निघत नाहीत, अशी तक्रार होत आहे.

या बैठकीत  बेळगावातील प्रत्येक खात्याचे अधिकारी विकासकामे राबविण्यात कमी पडत आहेत. नागरिकांनी अधिकारीवर्गाकडे समस्या मांडल्यानंतर ते आपले काम नव्हे. त्या खात्याचा या कामाशी संबंध येतो, असे सांगून तक्रारदाराची बोळवण केली जाते. त्यामुळे शहराचा विकास खुंटला असल्याचा थेट आरोप नागरिकांनी  केला.महाव्दार रोडकडील उड्डाण पुलाचे काम झाले असले तरी पूल केल्यामुळे बाजूने नागरिकांना रहदारीसाठी रस्ता नाही. यामुळे भरतेश हायस्कूलमध्ये येणार्‍या मुलांना येताना चिखलातून वाट काढावी लागते. या रस्त्यावर फळविक्रेते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करीत होते. त्याना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. या रस्त्यालगत भूमिगत वीजवाहिन्या यापूर्वी घालण्यात आल्या आहेत. त्या पुलाचे काम चालू झाल्यानंतर काही ठिकाणी तुटल्या आहेत. पाण्याची मुख्य जलवाहिनी ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. यासंबंधी नागरिकांनी अधिकारी वर्गाकडे तक्रार केल्यास एकमेकाकडे बोट दाखविले जाते. नागरिकांच्या समस्या ऐकून नूतन आमदारांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. पण अधिकार्‍यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यातच धन्यता मांडली. त्यामुळे बैठकीला उपस्थित नागरिकांची करमणूक झाली. समस्या सोडविण्यावर काय करायला हवे, यावर चर्चा होण्याआधीच बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीला महानगरपालिका, बीएसएनएल, हेस्कॉम व पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.