Fri, Apr 26, 2019 01:27होमपेज › Belgaon › कपिलेश्‍वर तलावात वृद्धाचा मृत्यू

कपिलेश्‍वर तलावात वृद्धाचा मृत्यू

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

कपिलेश्‍वर तलावात दररोज पोहणार्‍या रामा यल्लाप्पा बसरीकट्टी (वय 72, रा. गाडेमार्ग, शहापूर) यांचा त्याच तलावात सोमवारी बुडून मृत्यू झाला.सकाळपासून त्यांना बीपीचा त्रास होत होता. तरीही  ते चालत कपिलेश्‍वर तलावाकडे गेले होते. सकाळी सातच्या सुमारास परत येणारे बसरीकट्टी अजून का आले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा पहावयास कपिलेश्‍वरवर पोहोचला असता, तलावाच्या काठावर त्यांचे चप्पल व कपडे दिसले. संशय आल्याने अग्‍निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर  जवानांनी कपिलेश्‍वर तलावात शोध घेतल्यानंतर रामा बसरीकट्टी यांचा मृतदेह हाती लागला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे  असा परिवार आहे.

महानगरपालिकेचे दुर्लक्ष 

कपिलेश्‍वर तलावाचा ढासळलेला बुरुज वादात सापडला असून, अद्याप तो दुरुस्त झाला नाही. बसरीकट्टी यांचा मृतदेह शोधत असताना गणेशमूर्तीचा पाटही सापडला. गणेश विसर्जनानंतर कपिलेश्‍वर तलावाकडे स्वच्छतेच्या द‍ृष्टीने महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप दररोज या तलावात पोहणार्‍या नागरिकांनी केला आहे.