Fri, Apr 26, 2019 16:09होमपेज › Belgaon › मुलाला भेटण्यासाठी निघालेली महिला दुचाकी अपघातात ठार

मुलाला भेटण्यासाठी निघालेली महिला दुचाकी अपघातात ठार

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMनिपाणी/कोगनोळी : प्रतिनिधी

मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या महिलेचा रविवारी दुचाकी-रिक्षा अपघातात मृत्यू झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळच्या मतिवडे फाट्यानजीक दुपारी हा अपघात झाला.

अर्पणा महादेव ऐवाळे (वय 50, रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे महिलेचे नाव आहे. दुचाकीचालक  सिदगौडा (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि मयत अर्पणा यांच्या जाऊ गीता हेमंत ऐवाळे(वय 40) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही अपर्णा यांच्या कोल्हापुरात राहणा़र्‍या मुलाला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी  रासाई शेंडुर येथुन एक रिक्षा वृध्देला कोल्हापुर येथे उपचारासाठीघेऊन निघाला होता.  

मतिवडे फाट्याज़वळ दुचाकीने रिक्षा मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर आपटून जखमी झाले. त्यांना रुग्वाहिकेतून कोल्हापूरला नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच अर्पणा यांचा मृत्यू झाला. तर गिता व सिदगौडा यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनास्थळी ग्रामीण पोलिस निरीक्षक फौजदार निंगनगौडा पाटील यांनी भेट दिली. तर पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे आण्णापा खराडे यांनी सहकार्‍यांसह जखमींना कोल्हापूरला हलवण्यास मदत केली.