Fri, Jul 19, 2019 20:29होमपेज › Belgaon › दसरा सुटीत होणार कपात?

दसरा सुटीत होणार कपात?

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 8:54PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी शाळांना ऑक्टोबर  दसर्‍याची सुटी 2 ते 28 पर्यंत घोषित करण्यात आली होती. मात्र शिक्षण खात्याने कपात सुचवली आहे. ही सुटी 6 ते 21 ऑक्टोबरपर्यंत देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

एनसीईआरटी आणि आरटीई नियमानुसार वर्षाला 221 दिवस शाळेचे कामकाज झाले पाहिजे. मात्र सदर शाळांना अतिवृष्टी, राष्ट्रीय नेत्याचे निधन आदी कारणाने सुटी दिली जात आहे. यामुळे शाळांचे वर्षभरातील कामकाज कमी होत आहे. परिणामी  दसरा सुटीत कपात करण्याचा शिक्षण खात्याचा विचार आहे. 

मात्र यावर्षी शाळांचे कामकाज व्यवस्थित झाले आहे. फक्त दोनच दिवस सुटी झाली आहे. शिक्षण खात्याचे आयुक्त डॉ. पी. सी. जाफर यांनी सुटी कपात केल्यास शिक्षक संघटना विरोध करतील, असे म्हणणे मांडले आहे. दसर्‍याची सुटी 2 ते 28 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. नारायणस्वामी यांनी केली आहे.