Sun, Jul 05, 2020 14:51होमपेज › Belgaon › डी. के. शिवकुमार आणि पी चिदंबरम यांच्यासाठी ईडीकडून फक्त 'कॉपी-पेस्ट'!

डी. के. शिवकुमार आणि पी चिदंबरम यांच्यासाठी ईडीकडून फक्त 'कॉपी-पेस्ट'!

Last Updated: Nov 16 2019 1:58AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला चांगलीच फटकार लगावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार  यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या जामीनविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन फेटाळावा अशी मागणी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावलीच, पण त्यांचे चांगलेच कान उपटले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने यांच्या खंडीपाठाने याचिका फेटाळली. ईडीकडून सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली. 

देशातील नागरिकांना वागवण्याची ही पद्धत नव्हे अशा शब्दात खंडपीठाने ईडीचे कान उपटले. डी. के. शिवकुमार यांच्या केसमध्येही चिंदबरम यांच्यावेळी  सादर केलेली कागदपत्रे सादर करत आहात. हे फक्त कॉपी पेस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डी. के. शिवकुमार यांच्याविरोधीत एफआयआर रद्द करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. 

 शिवकुमार यांना २३ ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने २५ लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यांना परदेशात  जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.