Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Belgaon › आयुक्‍तांकडून गुन्हेगारांची दुसर्‍यांदा हजेरी

आयुक्‍तांकडून गुन्हेगारांची दुसर्‍यांदा हजेरी

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:53PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

पोलिस आयुक्‍तपदाचा भार स्वीकारल्यानंतर डी. सी. राजप्पा यांनी आयुक्‍तालय विभागातील 14 पोलिस ठाण्यांतील यादीवरील गुन्हेगारांची हजेरी घेतली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा राजप्पा यांनी यादीतील गैरहजर गुन्हेगारांची परेड घेतली आहे.

राजप्पा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्‍तालय हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना गुन्हेगारांची यादी सादर करण्याची सूचना केली होती. राजप्पा यांच्या सूचनेनुसार गेल्या रविवारी पोलिस यादीवरील गुन्हेगारांची पहिली हजेरी फेरी पार पडली. गैरहजर असलेल्यांना गुरुवारी हजर होण्याची सूचना बजाविण्यात आली होती. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी पोलिस परेड ग्राऊंडवर यादीवरील गुन्हेगारांनी हजेरी लावली.

पोलिस आयुक्‍त राजप्पा यांनी  उपस्थितीत प्रत्येकाची सविस्तर माहिती घेतली. तसेच सध्या करत असलेल्या कामाबद्दल विचारणा केली. नव्या गुन्ह्यात सापडल्यास चांगलीच हजेरी घेतली जाईल. मात्र, चांगले वर्तन राखल्यास यादीवरील नावे वगळली जातील, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.