होमपेज › Belgaon › कर्नाटकातील गुन्हेगारीत दोन टक्क्यांची घट

कर्नाटकातील गुन्हेगारीत दोन टक्क्यांची घट

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:45AMबंगळूर : प्रतिनिधी    

 राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख असून गुन्हेगारी प्रमाणात 2 टक्क्याची घट झाल्याचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण 7 टक्क्यांनी वाढले होते. मात्र, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे प्रमाण 5 टक्क्यांवर आले. कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यास काँग्रेस सरकार प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.

काडुगोंडनहळ्ळी येथे नूतन पोलिस स्थानक इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.