Sun, Jul 21, 2019 15:03
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सौंदलगा येथे गायीचे डोहाळ जेवण

सौंदलगा येथे गायीचे डोहाळ जेवण

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 8:17PMसौंदलगा : वार्ताहर

पानारी मळ्यातील शेतकरी बाळासाहेब पाटील व त्यांची पत्नी शकुंतला पाटील यांनी आपल्या सोनू गायीचे डोहाळ जेवण  उत्साहात साजरे केले.

हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्व आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि गोठ्यातील सहवासाला महत्त्वपूर्ण अशी आयुर्वेद व विज्ञानाने मान्यता दिली आहे. गोमूत्र अनेक रोगांवर रामबाण औषध म्हणून उपयुक्‍त ठरत आहे. गायीला देवता समजण्यात येते. यामुळेच गायीचे डोहाळ जेवण केले. 

बाळासाहेब पाटील, शकुंतला पाटील व सुना जयश्री व सुनीता यांनी   गायीला सजविले होते. दोन शिंगांमध्ये हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या होत्या. शिंगाभोवती मोगरा, गळ्यात झेंडूच्या फुलाचा हार घालण्यात आला होता. पाठीवर हिरव्या रंगाची सहावारी साडी घातली होती. पायात फुलांच्या माळा घालून गायीला सजविले होते. शकुंतला पाटील, शिवाणी ढवणे, शांताबाई पाटील, मेघा मोरे, सुरेखा विभुते यांच्यासह सुवासिनींकडून हळदी-कुंकू व ओटी भरणे कार्यक्रम पार पडला.

हालशुगरचे माजी अध्यक्ष एस. एस. ढवणे, संभाजी साळुंखे, के. डी. परमकर, जानू भेंडूगळे, हरी विभुते, संदीप पाटील, सूर्यकांत शेवाळे, संजय पाटील, सौरभ पाटील, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.