Tue, Feb 19, 2019 20:55होमपेज › Belgaon › बनावट नोटा : चिकोडीत छापे

बनावट नोटा : चिकोडीत छापे

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:22AMचिकोडी : प्रतिनिधी

बनावट नोटांप्रकरणी राष्ट्रीय तपासणी पथकाच्या (एनआयए) मुंबईतील अधिकार्‍यांनी सोमवारी रात्री  चिकोडीत छापे टाकून अशोक कुंभार (वय 36) या युवकाला अटक केली. त्याच्याकडून 80 हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्‍त करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, बनावट नोटांप्रकरणी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय असून, आज एनआयच्या पथकाने ढालुमिया इस्लाम (वय 25) या बंगालच्या युवकाला चिकोडीत आणले होते. त्याच्या सांगण्यावरूनच चिकोडीत छापा घातला.

बंगाली युवकाच्या सांगण्यावरून

मुंबईहून निरीक्षक मिलिंद काटे यांच्या नेतृत्वाखाली 6 जणांचे पथक ढालुमिया या बंगाली युवकाला घेऊन चिकोडीत दुपारी दाखल झाले होते. त्यांच्यासमेवत कोल्हापूरच्या दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारीही होते. काटे यांनी अशोक कुंभारला ताब्यात घेऊन त्याच्यासह ढालुमियाला चिकोडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठेवले होते. त्याच्याकडून बेळगाव जिल्ह्यातील बनावट नोटांच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू होती.