Mon, May 20, 2019 22:21होमपेज › Belgaon › कर्नाटकात मतमोजणीचे काऊंटडाऊन

कर्नाटकात मतमोजणीचे काऊंटडाऊन

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:37AMबेळगाव  : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी येथील आरपीडी महाविद्यालयात होणार असून, महाविद्यालयाला छावणीचे रूप आले आहे. तर मंगळवारी होणार्‍या मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांची मतमोजणी ‘आरपीडी’मध्येच होईल.

जिल्ह्यात 203 उमेदवार असून, मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. राज्याचा निकालही दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर होईल. 224 पैकी 222 मतदारसंघांसाठी शनिवारी मतदान झाले.

मतमोजणी केंद्र असलेल्या आरपीडी परिसरात मतदारसंघनिहाय पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.  निकाल ऐकण्यासाठी जिल्हाभरातून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील वाहतुकीच्या  मार्गांत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त चंद्रशेखर यांनी पत्रकाद्वारे दिली.

उमेदवार : मतमोजणी केंद्रात येणार्‍या  उमेदवारांना आरपीडी महाविद्यालयाच्या पहिल्या गेटने प्रवेश देण्यात येणार आहे. उमदेवारांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था आरपीडी मैदानावर करण्यात आली आहे. 

एजंट : पोलिंग-काऊंटिंग एजंटांना जीएसएस महाविद्यालयाच्या गेटने प्रवेश देण्यात येईल. त्यांची वाहने पार्क करण्याची सोय बिग बाजार रोडवर करण्यात आली आहे.

प्रसार माध्यमे : प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना भाग्यनगर दुसरा क्रॉस मार्गे  आत जावून डावीकडील बाजूस असणार्‍या आंब्याच्या बागेतील गेटमधुन प्रवेश मार्ग ठेवण्यात आला आहे. तर आरपीडी मैदानावर वाहन पार्कींगसाठी सोय करण्यात आली आहे. या बरोबरच माध्यप्रतिनिधींसाठी प्रसारमध्यम कक्षाची सोय करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी येणार्‍या आरओ व कर्मचार्‍यांना ही हाच मार्ग ठेवण्यात आला आहे. 

समर्थक

विविध विधानसभा मतदार संघातून येणार्‍या नागरीकांना वाहन पार्किंगची सोय खालील प्रमाणे करण्यात आली आहे. 

*गोवावेस सर्कल ते मराठा मंदिर 

निपाणी, चिक्‍कोडी?सदलगा, रायबाग, कुडची, या भागातील नागरीकांसाठी सोय करण्यात आली आहे.

*लेले मैदान व व्हॅक्सीन डेपो 

अथणी, कागवाड, गोकाक, अरभावी, हुक्केरी, यमकनमर्डी या भागातील नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 

*आदर्श नगर मैदान बैलहोंगल, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती. 

या भागातून येणार्‍या नागरिकांसाठी नाथ पै सर्कल येथून वडगाव पोलिस ठाण्याकडे जाणार्‍या डाव्या बाजुकडील आदर्श नगर शाळा मैदान व आदर्श नगर रस्त्यावर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

*तिसरा रेल्वे गेट ते पिरनवाडी रस्ता 

खानापूर, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण या भागातून येणार्‍या नागरिकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली वाहने पार्क करून भाग्य नगर दुसरा क्रॉसकडून डावीकडे वळून शेजारी असणार्‍या आंब्याच्या बागेतील गेटद्वारे आरपीडी मैदानावर जाण्याची सोय करण्यात आली आहे. टिळकवाडी भागातील पहिला रेल्वे गेट, दुसरा रेल्वे गेट आणि तिसरा रेल्वे गेट या ठिकाणी वारंवार रेल्वे वाहतुकीसाठी गेट बंद करावा लागतो. त्यामुळे काँग्रेस रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी होते. यासाठी नागरिकांनी बदल करण्यात आलेल्या मार्गाने ये-जा करावी. 

*गोवावेस-आरपीडी रस्ता बंद

मतमोजणीदिवशी म्हणजे मंगळवारी गोवावेस सर्कल येथून आरपीडी सर्कल जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. सदर वाहने महावीर भवन येथून डावीकडे वळवून गुरुदेव रानडे रस्ता, भगतसिंग गार्डन शेजारील रस्त्यावरून आदर्श नगर येथून वडगाव ोलिस स्थानक समोरून भाग्यनगर दहावा क्रॉसद्वारे अनगोळ, हरिमंदिर क्रॉस येथून पुढे जावे. तिसरा रेल्वे गेटद्वारे गोवावेस सर्कलकडे जाणारी वाहने बिगबाझार क्रॉस येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळून डावीकडे वळून दुसरा रेल्वे गेटद्वारे काँग्रेसरोड कडे जावे. शहापूरकडून शहरात येणारी सर्व वाहने गोवावेस सर्कल येथून उजवीकडे वळून महात्मा फुले रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनिमंदिरमार्गे अथवा जुना पी. बी. रोड रस्त्याने पुढे जातील.