Thu, Jul 18, 2019 16:55होमपेज › Belgaon › माध्यान्ह आहार तयार करताना कुकरचा स्फोट; २ महिला गंभीर

माध्यान्ह आहार तयार करताना कुकरचा स्फोट; २ महिला गंभीर

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:34AMरायबाग : प्रतिनिधी

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहार तयार करताना कुकरचा अचानक स्फोट होऊन दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी येथे बुधवारी घडली.

निडगुंदी येथील सरकारी हायस्कूलमध्ये रोजच्या प्रमाणे माध्यान्ह आहार तयार केला जात होता. मात्र दुपारी अचानक कुकरचा स्फोट होऊन स्वयंपाक करणार्‍या कस्तुरी मुत्ताप्पा नाईक (38) आणि शानव्वा सुरेंद्र कोळी (32) या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर त्वरेने रायबाग येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून आता धोका टळला आहे.

कुकरमध्ये तांदूळ शिजवला जात होता. गॅसवर कुकर लावल्यानंतर काही वेळाने स्फोट झाला. त्यामुळे झाकण उडून दूरवर पडले आणि तांदूळ जवळच्या भिंतीवर पसरले गेले. स्फोटाच्या आवाजाने काही काळ खळबळ माजली. घटनास्थळी गट शिक्षणाधिकारी सी. आर. ओणी, तहसीलदार जमादार यांनी भेट देऊन पाहणी केली. रायबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.