Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Belgaon › प्रजासत्ताक सोहळ्यात खासदार-आमदार भिडले

प्रजासत्ताक सोहळ्यात खासदार-आमदार भिडले

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:02PMचिकोडी : प्रतिनिधी 

येथे झालेल्या तालुकास्तरीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चक्क व्यासपीठावर खासदार प्रकाश हुक्केरी व विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या जोरदार शाब्दिक चकमक झाली.

तालुका क्रिडांगणावर तालुका प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिन कार्यक्रम झाला.  विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या भाषणात पद्यश्री, पद्यविभूषण, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या राज्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचे व केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

यानंतर खासदार प्रकाश हुक्केरींनी आपल्या भाषणात केंद्र सरकार राज्य सरकारच्या शिफारशीनुसार हा पुरस्कार दिला जातो. तसेच आपण देखील मतदारसंघातील सितव्वा जोडट्टी यांना पुरस्कार देण्यासंबंधी शिफारस पत्र पाठविले होतो. पण कवटगीमठ केवळ केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहेत, असा टोला लगावला. तसेच आपल्या विकासकामांविषयी माहिती दिली.कवटगीमठांनी त्याला आक्षेप घेत, सरकारी कार्यक्रमात आपल्या कामांचा प्रचार करणे अयोग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये जोरादर शाब्दीक चकमक घडली. 

कोणत्याही स्थितीत आपण व सरकारने केलेली कामे मांडणार असल्याचे हुक्केरींना सांगितले. तर आ. कवटगीमठांनी सरकारी कार्यक्रमात राजकीय भाषण करत शिष्टाचाराचे उल्लंघन होत असून आपण बघ्याची भूमिका का घेता असा सवाल करत प्रांताधिकर्‍यांना धारेवर धरले, तसेच बहिष्कार घालून सभेतून निघून गेले. यापूर्वी मागील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात देखील असा गोंधळ झाला होता. शाब्दिक चकमकीनंतर दहा मिनिटात कार्यक्रम संपवण्यात आला.