Sat, Jul 20, 2019 13:30होमपेज › Belgaon › विवाह समारंभांच्या खर्चावर हवा लगाम !

विवाह समारंभांच्या खर्चावर हवा लगाम !

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

महागाई आहे म्हणून खर्च जपून करावा लागणार, असे प्रत्येकजण म्हणत होता. मात्र, वर-वधूपित्यांनी लाखोंची उलाढाल करत लग्नाचा बार उडविला. ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरु असून लग्नकार्य मोठ्या थाटात करावे, असा आग्रह अनेक वर पक्षांकडून केला जात आहे. 

दिवाळीपासून लग्नसराईला प्रारंभ होतो. जूनपर्यंत लग्न असतात. मात्र, यावर्षी लग्नाचे मुहूर्तही कमी असल्याने लग्नाची घाईगडबड सुरु आहे. आपल्या मुला-मुलीचे लग्न चांगले व्हावे, यासाठी मोठा खर्च केला जातो. यात कपडे, संसारोपयोगी वस्तू, गाड्या, वाजंत्री, मंडप, कार्यालय, जेवण व लग्नपत्रिका यावर मोठा खर्च होत असतो. 

मागील पाच वर्षात महागाई वाढली आहे. यामुळे लग्नकार्य करताना अनेक सर्वसामान्य कुटुंब कर्जबाजारी झालेली आहेत. गेल्या काही वर्षात सोन्याचे भावदेखील वाढले आहेत. लग्नकार्यात दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने सर्वसामान्य नागरिक या दागिन्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. 

बेळगाव शहरात अनेक मंगल कार्यालये आहेत. सध्यस्थितीत घरासमोर होणारी लग्ने दुर्मिळ झालेली आहेत. वधू-वरांचा कार्यालयाकडे वाढता कल दिसून येत असून अनेकजण कर्ज काढून पैशांची उधळपट्टी करताना दिसतात. 

लग्नासाठी लागणार्‍या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला लग्नासाठी लागणारे कपडे 50 हजार ते 2 लाख, जेवण 20 ते 50 हजार, वाजंत्री  15 ते 50 हजार, संसारोपयोगी वस्तू 50 हजार ते 2 लाख, दागिने 1 लाख ते 2 लाख, इतर खर्च 50 हजार असा लाखोंचा चुराडा लग्नसमारंभात केला जात आहे.  यातून काहीही निष्पन्न होत नाही. यासाठी सध्यस्थितीत सामुदायिक विवाह किंवा नोंदणी विवाह करणे उत्तम आहे. 

सामुदायिक सोहळ्यांची गरज

बेळगावात सुराज्य निर्माण संघातर्फे दरवर्षी मराठा मंदिर कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो.  याव्यतिरिक्त कोणतीही संस्था किंवा संघटना असे उपक्रम राबवत नाही. सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. अनेक गरीब कुटुंबांना अशा सोहळ्यांमुळे लाभ होणार आहे. त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज